सखाराम मेस्त्रींच्या कुटुंबियांना आमदार वैभव नाईक यांची आर्थिक मदत…

2

 

बंदुकीची गोळी लागून मेस्त्री यांचा झाला होता अपघाती मृत्यू…

कणकवली,ता.२१ : भात शेतीत आलेले डुक्कर हुसकावून लावण्यासाठी काडतुस बंदुकीतून झाडलेली गोळी लागून जानवली गावठणवाडी येथील सखाराम मनोहर मेस्त्री यांचा मृत्यू झाला.यामुळे मेस्त्री कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला बुधवारी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी सखाराम मेस्त्री यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस केली.तसेच कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात देत सांत्वन केले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, कलमठ ग्रामपंचायत सदस्य राजू राठोड, दिनकर परब, बाळू पारकर,जानवली शाखा प्रमुख रवी गोसावी, भालचंद्र दळवी, प्रशांत राणे, भूषण परुळेकर, बाबू आचरेकर, व जानवलीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

20

4