पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले दाभोली ग्रामस्थांचे हात…

385
2

वेंगुर्ले.ता,२२: कोल्हापूर आणि सांगली जिल्हयात काही दिवसापूर्वी उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमूळे तेथिल नागरिकांचे जनजिवन विस्कळीत झाले आहे, या पुरस्थितीमुळे सर्वांचे संसारच उद्वस्थ झाले आहेत. सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील या नागरिकांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली गावातील नागरिकांचे मदतीचे हात पुढे सरसावले.

या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दाभोली गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत गावातुन धान्य, साबण,भांडी, कपडे आदी वस्तू एकत्र करून तेथे पाठविल्या. सांगली जिल्ह्यातील टिळक चौक येथील पूरग्रस्त नागरिकांना या मदतीचे वाटप दाभोली ग्रामस्थांच्या वतीने वेंगुर्ले पंचायत समितीचे माजी सदस्य समाधान बांदवलकर यांच्या हस्ते गावाच्यावतीने करण्यात आले. यावेळी सांगली जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि पूरग्रस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे आपल्यावर उभ्या राहिलेल्या या अस्मानी संकटात दाभोली गावातील नागरिकांनी सढळ हस्ते मदत केल्यामुळे येथिल सर्व नागरिकांनी दाभोली गावांतील सर्व नागरिकांचे आभार मानले आहेत.

4