गणेश चतुर्थी काळात भक्तांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या…

2

सुशांत खांडेकर: शांतता समितीच्या सभेत वीज, बांधकाम,एसटी खात्याला आदेश…

सावंतवाडी.ता,२२: गणेश चतुर्थीच्या काळात भक्तांची गैरसोय होणार नाही याकडे वीज मंडळ, बांधकाम खाते, बीएसएनएल कंपनी, एसटी विभागाने दक्षता पूर्वक काळजी घ्यावी तसेच या काळामध्ये गणेश भक्तांच्या मनात शांतता भंग होणार नाही. याकडे लक्ष द्यावे असे निर्देश उपविभागीय महसूल अधिकारी सुशांत खांडेकर यांनी शांतता समीतीच्या बैठकीत दिले.

सावंतवाडी तालुका शांतता समितीची बैठक प्रांत सुशांत खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले ,सभापती पंकज पेडणेकर उपस्थित होते.

तसेच उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर ,नगरसेवक सुरेंद्र बांदेकर,आनंद नेवगी,दिपाली भालेकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर ,बाळ बोर्डेकर ,सुरेश भोगटे, पत्रकार अभिमन्यू लोंढे,रेमी आल्मेडा, बांधकाम उपअभियंता अनंत निकम, राजन चव्हाण ,विज सहाय्यक अभियंता भालचंद्र कुलकर्णी ,पोलीस उपनिरिक्षक योगेश जाधव , आरोग्य विभाग, वनखाते, नगरपरिषद ,आगार व्यवस्थापक श्री सय्यद असे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी एसटी विभागाने प्रवाशांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष द्यावे असे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी सुचवले रेल्वे स्टेशन वर येणाऱ्या रेल्वे गड्यातील प्रवाशांना साेय करून देण्यासाठी रेल्वे स्टेशन वर कंट्रोल रूम ठेवावा असे निर्देश दिले .

तालुक्यातील प्रवाशांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष देताना सावंतवाडी रेल्वे टेशन ते बांदा अशी बस सुरू करावी. अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी गणेश चतुर्थीच्या सणाच्या काळात येणाऱ्या जादा एसटी बसेस च्या माध्यमातून प्रवाशांच्या गैरसाेय दूर करावी असे प्रांताधिकाऱ्यांनी सुचवले .

आरोग्य विभागाने रेल्वे टेशन, सावंतवाडी बस स्थानक व बांदा बसस्थानकावर आरोग्य तपासणी पथके सणाच्या काळात सुरू करून असे निर्देश श्री खांडेकर यांनी दिली .विज समस्ये बाबत गैरसाेयी दुर करणेबाबत यावेळी उपस्थितांनी समस्या मांडल्या त्यावर प्रांताधिकारी खांडेकर यांनी तहसिलदार यांच्या उपस्थितीत वीज कर्मचाऱ्यांची एक बैठक घेऊन वीज कर्मचाऱ्यांना सणाच्या काळामध्ये गैरसाेय निर्माण होणार नाही. याची दक्षता घेण्याबाबत मार्गदर्शन करावे अशी खांडेकर यांनी सुचवले.

वीज प्रश्नावर सभापती पंकज पेडणेकर किल सूचना केल्या यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी विज समस्या गैरसोय नसावी याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे असे सुचवले तसे वीज मंडळाच्या कार्यालयातील फोन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुसंस्कृत भाषेत बोलावे आणि फोन उचलावा याबाबत अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याबाबत भालचंद्र कुलकर्णी यांना निर्देश देण्यात आले .

यावेळी प्रवीण भोसले पंकज पेडणेकर हेमंत मराठे यांनी मळगाव आजगाव मळेवाड आधी रस्त्यांबाबत समस्या मांडली आणि बांधकाम खात्याने याकडे लक्ष द्यावे अशी सुचविले. मळगाव तळवडे या रस्त्याची देखभाल योग्य पद्धतीने होत नसल्याचे सभापती पेडणेकर यांनी सांगितले.

बांधकाम खात्याचे उपअभियंता अनंत निकम यांनी गणेश चतुर्थी सणापूर्वी रस्त्यांची डागडुजी करण्यात येईल रस्ते वाहतुकीस याेग्य केले जातील असे सांगितले .आंबोली घाट रस्ता तीन ठिकाणी नादुरुस्त झाला आहे त्यामुळे धुक्यातून येणाऱ्या वाहनधारकांना रिप्लेक्टर बसवुन रस्ता दाखवा याकडे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी लक्ष वेधले आंबोलीचा घाट केव्हा सुरू होणार याबाबत देखील चर्चा झाली आंबोली घाट वाहतुकीस सध्या बंद आहे तो लवकरच सुरू होईल असे बांधकाम अधिकाऱ्यांनी सांगितले .

गणेशभक्त आंबोली घाटातून येणार आहेत त्यांना आंबोली घाट चतुथीेॅपूर्वी खुला करावा असे उपस्थित सदस्यांनी सांगितले .यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर नगरसेवक सुरेंद्र बांदेकर आनंद नेवगी यांनी सावंतवाडी शहरातील बांधकाम खात्याच्या रस्त्याबाबत नाराजी व्यक्त केली लवकरच सुस्थितीत आणावे असे सुचविले सार्वजनिक बांधकाम खाते आणि जिल्हा परिषद बांधकाम खात्याच्या रस्त्यांची डागडुजी करून गणेश भक्तांना रस्ते सुरळीत करावेत तसेच रस्त्यांच्या बाजूला झाडी वाढली आहे ती तोडून वाहनधारकांना रस्ता दिसेल असे करावे अशा सूचना देखील या बैठकीत मांडण्यात आल्या.

रस्त्यातील खड्डे यांबाबत निर्णय घेण्याचे सूचना झाले मळगाव इन्सुली आंबोली व आकेरी घाटीत बांधकाम खात्याने रिप्लेक्टर लावावे असे यावेळी सुचविण्यात आले यावेळी प्रांताधिकारी यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक रस्ता इन्सुली बिलेवाडी , कुंभावडे काम करण्यात आल्याचे सांगितले .बिलेवाडी रस्ता काम चालू असल्याचे देखील सांगितले .

आंबोली घाट रस्ता वाहतुकीस योग्य नसल्याने एसटी बंद आहे .एसटी बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे त्यामुळे मिनीबस आणून प्रवाशांची गैरसोय दूर करावी आणि गणेश चतुर्थीच्या काळात प्रवाशांना शहराशी जोडले जावे असे अभिमन्यू लोंढे यांनी सुचविले तसेच मिनीबस राज्यात कुठे असतील त्या पर्यायी व्यवस्था म्हणून आंबोली घाट रस्त्यासाठी आणल्या जाव्यात अशी मागणी केली याबाबत प्रांताधिकारी खांडेकर यांनी आगार व्यवस्थापक श्री सय्यद यांना निर्देश देऊन वरिष्ठांना कळवावे असे सुचविले.

यावेळी वीज मंडळाच्या कारभारावर अनेकांनी आपली गार्‍हाणे मांडले पूरस्थितीचा काळातून वीज मंडळ सावरत आहे असे सहाय्यक अभियंता भालचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले मोठ्या लाईन वरील झाडे कट केली जात आहे तसेच सावंतवाडी ३ लाईन मधून वीज सप्लाय केला जातो नादुरुस्त झाली तर दुसऱ्या लाईन मधून किंवा तिसरा लाईन मधून वीज पुरवठा केला जाईल अशी कुलकर्णी यांनी सांगितले.

यावेळी खांडेकर म्हणाले विज अधिकारी व कर्मचाऱ्यांना वीज मंडळाने माेबाईल दिले आहेत त्या फोनचा वापर केला जावा ते कंपनीने दिले असल्याने अहोरात्र सुरू राहावेत ग्राहकांचा फोन आला तर तो त्यातून समस्या सोडवावी ग्राहकांना तक्रार बुकमध्ये नोंद करण्यास सांगु नये तसेच वायरमन व कर्मचारी सणाच्या काळात ड्युटीवर असावे असे निर्देश देऊन नवीन जोडणी अर्ज असल्यास त्यांची निवारण जलद गतीने करावे आणि वीज मंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्याने आपले कर्तव्य पालन करावे असे निर्देश खांडेकर यांनी दिले.

यावेळी व्यापारी संघाचे बाळ बाेडेॅकर म्हणाले ,सावंतवाडी शहरात खाजगी बस याव्यात त्या झारापवरून परस्पर गोव्यात जायला नको याकडे लक्ष वेधले यावेळी प्रांताधिकारी यांनी सावंतवाडी तून बस याव्यात म्हणून आरटीओने तात्काळ त्यांना नोटीस द्यावी असे सुचविले .यावेळी पत्रकार हेंमत मराठे यांनी सावंतवाडी मार्गाचे बस चे परमिट असल्याने कायमस्वरूपी बस सावंतवाडी शहरातूनच घ्यायला हव्यात याकडे लक्ष वेधले प्रांताधिकारी खांडेकर यांनी बस मालकांची एखादी बैठक घेऊन या समस्येवर तोडगा काढावा असे सुचविले.

यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी नगरपालिकेने सावंतवाडी शहरात केलेल्या उपाययोजनांची माहिती देऊन येत्या दि.२६ ऑगस्ट रोजी नियाेजन बैठक आयोजित केल्याचे सांगितले .यावेळी गणेश चतुर्थीच्या काळात बस स्थानक रेल्वे स्थानक वर ठेवून आरोग्य तपासणी करावी तसेच साप चावल्यानंतर चे औषध व इंजेक्शने उपलब्ध असावी याकडे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी लक्ष वेधले. प्रांताधिकाऱ्यांनी तसे निर्देश आरोग्य विभागाला दिले .
आंबोली घाटातून अवजड वाहतूक बंद आहे आंबोली घाट परिस्थिती पाहता पोलिस बंदोबस्त ठेवून आंबोली घाटाचे व्यवस्थापन केले जावे याकडे पोलिसांचे लक्ष श्री खांडेकर यांनी वेधले तसेच अवजड वाहने थांबवली जातील तेथे उपलब्ध असेल त्या ठिकाणी चालकाना स्वच्छतागृहात जाण्यास भाग पडावे असे निर्देश आरटीओ ना प्रांताधिकारी खांडेकर यांनी केले .

या सणाच्या काळात बी एस एन एल कंपनीची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने तातडीने उपाययोजना कराव्यात याकडे लक्ष वेधले. ऑनलाइन ग्राहकांना बीएसएनएल सेवा हवी आहे तसेच नेटवकेॅ हवे आहे, मोठ्या प्रमाणात चाकरमनी येणार असल्याने नेटवकेॅ कडे बीएसएनएल कंपनीच्या अधिकाऱ्यांचे लक्ष प्रांताधिकारी खांडेकर यांनी वेधले.

यावेळी नायब तहसीलदार श्री पवार यांनी आभार मानले.

फाेटाे:प्रांताधीकारी सुशांत खांडेकर शांतता समितीच्या बैठकीत बाेलताना व्यासपीठावर प्रवीण भाेसले,सभापती पंकज पेडणेकर.

4