वेंगुर्लेत शिवणक्लास प्रशिक्षित झालेल्या महीलांना प्रमाणपत्राचे वाटप

151
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले : ता.२२
वेंगुर्ले येथे भाजपा व पिंटू क्लासेस च्या वतीने महीलांसाठी शिवणक्लासचे आयोजन करण्यात आले होते. त्यामधील प्रशिक्षित ९६ महिलांना भाजपा प्रदेश चिटनीस राजन तेली व नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या हस्ते प्रशिक्षण पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना राजन तेली म्हणाले की माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु व सौ. उमा प्रभु यांच्या माध्यमातून महिलांच्या सबलीकरणासाठी वेग – वेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. महिला बचतगटांनी बनवीलेला माल विक्रीसाठी महीलांना सायकलींचे वाटप केले . विधवा महीलांना स्वताःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिलाई मशीन दिल्या. तसेच महिला एकत्रित येऊन उद्योग सुरु करण्यासाठी क्लस्टर युनीट उभे करून मीनी गारमेंट सुरु करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन केल्याचे सांगितले व लवकरच गणपतीनंतर महिलांना स्वताचा व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रशिक्षणार्थी महीलांना लुपीन फाऊंडेशन तर्फे प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई, नगरसेवक सुहास गवंडळकर, नगरसेविका श्रेया मयेकर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा व्रुंदा गवंडळकर व पिंटू क्लासेस चे पिंटू नाईक उपस्थित होते.