आंबोली घाट दोन दिवसात वाहतुकीसाठी खुला होणार.

2

युवराज देसाई: धोकादायक ठिकाणी एकेरी वाहतुकीची सक्ती..

सावंतवाडी.ता,२२: आंबोली घाटात मुख्य धबधब्याच्या ठीकाणी कोसळलेला रस्ता पुर्ववत करून येत्या दोन दिवसात एसटी बस सोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.त्या दृष्टीने युद्धपातळीवर काम सुरू आहे.अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांनी दिली.

त्या ठीकाणी वाहतूक सुरू करण्यात येणार असली. तरी धोकादायक ठीकाणी एकेरी वाहतूकीची सक्ती असणार आहे. असे त्यांनी सांगितले नुकत्याच झालेल्या पावसामुळे आंबोली घाटातील काही भाग धोकादायक बनला आहे. मुख्य धबधब्याच्या समोरचा रस्ता खचला आहे.त्यामुळे तब्बल चौदा दिवस हा घाट बंद आहे. या ठिकाणाहून फक्त दिवसाला चार चाकी कींवा हलक्या वाहनांसाठी प्रवेश सुरू आहे मात्र रात्री वाहतूक बंद ठेवण्यात येते.

त्यामुळे घाटाचे काम तात्काळ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार दरडीचा काही भाग कापून त्या ठिकाणी रस्ता सुरू करावा. असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले होते.त्यानुसार हे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.मात्र हा रस्ता सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. तर उर्वरित काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. असे देसाई यांनी सांगितले.

14

4