गजानन नाईक यांचा जिल्हा पत्रकार संघातर्फे सत्कार… 

2

सावंतवाडी ता.२२: मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल गजानन नाईक यांचे जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने आज स्वागत करण्यात आले.तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे,ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे,हरिश्चंद्र पवार,संतोष सावंत,जिल्हा सोशल मीडिया सेलचे समन्वयक अमोल टेंबकर,सावंतवाडी पत्रकार संघाचे खजिनदार रामचंद्र कुडाळकर,शुभम धुरी, प्रशांत सावंत,भक्ती पावसकर,तेजल कदम,रोहित पोकळे,निखिल जाधव आदी उपस्थित होते.
श्री.नाईक म्हणाले दहा हजार पत्रकारांच्या संघटनेचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली आहे.त्यामुळे त्याचा फायदा राज्यासह जिल्ह्यातील पत्रकारांना करून देण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत.जिल्ह्यातील पत्रकारांचे घरकुल सारखे प्रश्न तसेच आपत्कालीन परिस्थितीत किंवा आरोग्यासाठी लागणारी आर्थिक मदत देण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील त्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्याचा आपला मानस आहे.पत्रकारांच्या समस्या सोडविण्याकडे भर दिला जाईल
यावेळी श्री.जेठे यांनी श्री.नाईक यांना शुभेच्छा दिल्या.राष्ट्रीय स्तरावर काम करताना त्यांनी जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या आणि मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.

4