आमदार वैभव नाईकांनी फुकाचे श्रेय घेवू नये…

2

अशोक सावंत:वीज कंपनीच्या  कामगारांचे पगारच झाले नसल्याचा आरोप…

कुडाळ ता.२२:  वीज वितरण कंत्राटी कामगारांचे पगार झालेले नसताना आमदार वैभव नाईक यांनी सगळ्यांचीच दिशाभूल करत पगार झाल्याचे जाहीर केले.अशा फसव्या आमदारांकडे लक्ष देऊ नका,असा टोला वीज वितरणचे कंत्राटी कामगार नेते अशोक सावंत यांनी आज येथे लगावला.येथील विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांची श्री.सावंत यांनी भेट घेतली.दरम्यान त्यांनी कामगारांच्या पगाराबाबत जाब विचारला.
यावेळी कामगारांचे पगार झाले नसल्याचे अधीक्षक अभियंता यांनी स्पष्ट केले.त्यानंतर कंत्राटी कामगारांना पगार देणाऱ्या संबंधित ठेकेदाराला बोलवण्यात आले.त्यांनी सुद्धा पगार झाले नसल्याचे सांगत आज दिवसभरात होतील असे सांगितले.या सर्व प्रकारामुळे श्री.नाईक यांचे पितळ उघड झाले आहे.
यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष विनायक राणे ,पावशी माजी सरपंच श्रीपाद तवटे ,रूपेश कानडे ,बांव सरपंच नागेश परब,पावशी विभागीय अध्यक्ष सुरेश तानावडे,वीज वितरण कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आनंद लाड आदी उपस्थित होते.

4