शिक्षक भरतीतील कागदपत्र पडताळणी सदोष चौकशी करण्याची मागणी

106
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी ता.२२:
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक भरतीतील प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादितील उमेदवारांची सुरु असलेली कागदपत्र पडताळणी सदोष असल्याचा आरोप करीत त्याची चौकशी करण्याची मागणी भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्याकडे केली आहे.
या निवेदनावर वैभव चव्हाण, संकेत हर्णे, भाग्यश्री रेवडेकर, दीपिका हेवाळेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.9 ऑगस्ट 2019 रोजी वीना मुलाखत शिक्षण सेवक भरती प्रक्रियेची निवडयादी प्रसिद्ध करण्यात आली. सहावी ते आठवी इयत्तेच्या गणित व विज्ञान शिक्षक पदाची ही यादी आहे. यादितील उमेदवारांच्या कागदपत्रांची छानणी सुरु झाली असून ती सदोष असल्याचा संशय उमेदवारांमध्ये आहे. त्यामुळे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी, असे देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.