Thursday, October 10, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकुडाळमध्ये होणार दहा कोटीचे भंडारी भवन

कुडाळमध्ये होणार दहा कोटीचे भंडारी भवन

दीपक केसरकर: प्रशासनाकडून आवश्यक असलेल्या जागेची पाहणी

कुडाळ ता.२२: भंडारी समाजाच्या मागणीनुसार उभारण्यात येणाऱ्या भंडारी भवनासाठी दहा कोटीच्या निधीची तरतूद झाली आहे.जिल्ह्यातील भंडारी समाज बांधवांसाठी हे भवन कुडाळ येथे उभारण्यात येणार आहे.याबाबतचा निर्णय येथे आयोजित महत्त्वाच्या बैठकीत घेण्यात आला.अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकारपरिषदेत दिली.दरम्यान श्री.केसरकर यांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत भंडारी भवनासाठी आवश्यक असलेल्या जागेची पाहणी केली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता युवराज देसाई व अनामिका जाधव आदींसह भंडारी समाजातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
. या बैठकीत श्री.केसरकर म्हणाले,की कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भंडारी भवन हे भव्य दिव्य असेल,भंडारी भवनासाठी १० कोटींची तरतून केली आहे,आणि मच्छिद्रनात नाट्य गृह हे दोन्ही कुडाळ शहरात मोठ्या वास्तू निर्माण होणार आहेत.हे भंडारी भवन शासकीय निधीतून पूर्ण केले जाईल.त्यासाठी समाजातील बांधवाना पदरमोड किंवा फंड गोळा करावा लागणार नाहीं तसेच या भवनत,विध्यार्थीना वसतिगृह सोय,एक हॉल,चाळीस खोल्या,प्रशस्त ईमारत असे याचे स्वरूप असेल,या भवनावर भंडारी समाजातीलच शिष्ठ मंडळाची कार्यकरणी असेल,श्री केसरकर यांनी नियोजीत पत्रकार परिषदेत सांगितले.
या नंतर भंडारी भवनाची जागा पाहण्यासाठी येथिल तहसीलदार जवळील जागेची पाहणी केली आणि या जागेचा लवकरात-लवकर ताबा हा भंडारी समाजाला मिळेल असे श्री केसरकर यांनी सांगितले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,भंडारी समाज जिल्हाध्यक्ष अतुल बंगे, माजी अध्यक्ष मामा माडये ,जिल्हा भंडारी कार्याध्यक्ष रमण वायगणकर,सचीव राजू गवंडे,युवा भंडारी जिल्हा सचिव समिल जळवी,युवा जिल्हा सल्लागार निलेश उर्फ बंड्या जोशी,कुडाळ तालुका भंडारी तालुका अध्यक्ष एकनाथ पिंगुळकर,कुडाळ भंडारी माजी अध्यक्ष एकनाथ टेंबकर,सावंतवाडी भंडारी युवा तालुका अध्यक्ष अमित वेंगुर्लेकर,भंडारी युवा जिल्हा उपाध्यक्ष अनुप नाईक ,अशोक मालवणकर आदि उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments