बांदा मच्छी विक्रेती महिला खून प्रकरण तीनही आरोपी निर्दोष

2

सिंधुदुर्गनगरी
बांदा येथील मच्छी विक्रेती महिला किशोरी सावंत हिचा खून केल्या प्रकरणातील जकिन उर्फ बाबा खान, अशरफ इकबाल शेख आणि सूर्यकांत उर्फ बाब्या मुळ्ये या तिघांचीही येथील अतिरिक्त न्यायाधीश प्रकाश कदम यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
आरोपींच्या वतीने वकील सुहास सावंत, वकील यतीश खानोलकर आणि वकील विवेक टोपले यांनी काम पाहिले.
बांदा येथे मच्छीचा व्यवसाय करणाऱ्या किशोरी सावंत यांचा ११ जून २०१६ रोजी बांदा मुस्लिमवाडी येथील स्मशान भूमित मृतदेह आढळून आला होता. पोलिस तपासात किशोरी सावंत हिचा मृत्यु गळा दाबून झाल्याचे आढळून आले होते. यातील आरोपी जकिन उर्फ बाबा खान याने जुन्या वैमनस्यातून अशरफ इकबाल शेख व सुर्यकांत उर्फ बाब्या मुळ्ये यांचे सोबतीने मयत सावंत हीचा खुन केल्याचे पोलीस तपासात
निष्पन्न झाले होते. त्यामुळे या तिघांनाही अटक करुन त्यांचेविरुदध भादंवि कलम
३०२ सह ३४ नुसार गुन्हा दाखल करुन दोषारोपपत्र सत्र न्यायालय सिंधुदुर्ग येथे दाखल झाले होते.
या खटल्याची सत्र न्यायालय सिंधुदुर्ग येथे सुनावणी होवून तपासकामातील
त्रुटी, उपलब्ध पुराव्यातील विसंगती तसेच आरोपींच्या वकीलांनी मांडलेला
बचावाचा युक्तीवाद ग्राहय माणुन न्यायालयाने सदर खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

14

4