उभादांडा येथील १८ वर्षीय कु. आकांक्षा मांजरेकर हिचे निधन

2

 

वेंगुर्ले : ता.२२
मूळची उभादांडा-सिद्धेश्वरवाडी येथील कु. आकांक्षा यशोदिपक मांजरेकर (१८) हिचे अल्प आजाराने गुजरात येथे आकस्मिक निधन झाले. तिच्यावर सिद्धेश्वरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
कु.आकांक्षा ही आपल्या कुटुंबासमवेत गुजरात येथे राहत होती. यावर्षी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर शिक्षणानिमित्त ती पुणे येथे वास्तव्यास होती. काही दिवसांपूर्वी तिची तब्येत बिघडल्याने गुजरात येथे औषधोपचार सुरु होते. मात्र उपचारा दरम्यान तिची प्राणज्योत मावळली.
तिच्या पश्चात आई, वडील, एक बहिण, आजोबा, काका, काकी, चुलत भावंडे असा परिवार आहे. स्वभावाने मनमिळावू व अभ्यासात हुशार असलेल्या कु. आकांक्षाच्या अकाली निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. येथील रा.कृ.पाटकर हायस्कूलचे कर्मचारी अनिल साळगांवकर यांची ती भाची होय.

37

4