बांदयातील प्रकार:शहरात मात्र जोरदार चर्चा
बांदा ता.२२
एकतर्फी प्रेमातून युवतीच्या मागावर असलेल्या दोघा प्रेमवीर युवकांत युवतीसमोरच जुंपली. बांदा शहरातील कट्टा कॉर्नर चौकात प्रेमविरात रंगलेला ‘फ्री स्टाईल’चा सामना पाहण्यासाठी चौकात बघ्यांनीही गर्दी केली. युवतीने मात्र दोघांनाही नकार देत तिथून काढता पाय घेतल्याने दोघाही प्रेमवीरांचे चेहरे पाहण्यालायक बनले होते. ही घटना आज दुपारी बांदा शहरात घडली.
युवतीने मात्र दोघांचेही प्रेम नाकारले व येथून काढता पाय घेतला. त्यामुळे युवतीसाठी फ्री स्टाईल केलेल्या दोन्ही प्रेमवीरांचे हसे झाले. उपस्थितांमध्ये मात्र या विषयाची चर्चा सुरू होती.