नसीसी यूनिट प्रमाणपत्राचे मेजर जनरल गजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते वितरण
सिंधुदुर्गनगरी ता.२२ महाविद्यालयीन जीवनात संरक्षण दलाची ओळख करुन देणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच ‘एनसीसी’चा अभ्यासक्रम असलेल्या जिल्ह्यातील ४५ शाळा व कॉलेजना एनसीसी यूनिटचे प्रमाणपत्र आज युद्ध सेवा मेडल व विशिष्ठ सेवा मेडल प्राप्त एनसीसी संचालन महाराष्ट्रचे मेजर जनरल गजेन्द्र प्रसाद यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. तर १ सप्टेंबर पासून एनसीसीचे प्रत्यक्ष ट्रेनिंग सुरु होणार आहे.
एनसीसी अभ्यासक्रम यूनिटचे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम येथील ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या कार्यालयामध्ये आज युद्ध सेवा मेडल व विशिष्ठ सेवा मेडल प्राप्त एनसीसी संचालन महाराष्ट्रचे मेजर जनरल गजेन्द्र प्रसाद यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय छात्रसेनच्या कोल्हापूर हेडक्वार्टरचे प्रमुख ब्रिगेडिय आर. बी. डोग्रा, ५८ महाराष्ट्र बटालियन सिंदुदुर्गचे कमांडिंग ऑफिसर कर्नल देवेन भारद्वाज, कर्नल सुधीर सावंत आदि उपस्थित होते.
५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्यातील १६ कॉलेज आणि २९ माध्यमिक शाळा असा एकूण ४५ ठिकाणी एनसीसी अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. याबाबतचे प्रमाणपत्र आज वितरित करण्यात आले आहे. या ४५ शाळा कॉलेज मधून २९२० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यातील १५० मुलांना पहिल्या टप्प्यात म्हणजेच १ सप्टेंबर पासून एनसीसीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर उर्वरितांना पुढीलवर्षापासून हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ४५ शाळा कॉलेज मध्ये सुरु करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांसाठी ५५ ट्रेनर निश्चय करण्यात आले आहे. यातील १४ प्रशिक्षित झाले असून ४१ जणांचे प्रशिक्षण सुरु आहे. तोपर्यंत बटालियन मधील ऑफिसर शाळा कॉलेज मध्ये जावून एनसीसीचे प्रशिक्षण देणार असल्याची माहिती ५८ महाराष्ट्र बटालियन सिंदुदुर्गचे कमांडिंग ऑफिसर कर्नल देवेन भारद्वाज यांनी दिली.
फोटो ओळ-: छत्रपती शिवाजी कृषी महाविद्याल ओरोस येथे एनसीसी अभ्यासक्रमाबाबतचे प्रमाणपत्र वितरित करताना मेजर जनरल गजेंद्र प्रसाद तर प्रमाणपत्र स्वीकारताना विवेक राणे.