रेडियमच्या नावाखाली होणारी लूट थांबवा अन्यथा आंदोलन:जिल्हा रिक्षा संघटनेचा आरटीओला इशारा

302
2

सिंधुदुर्गनगरी ता.२२ : रिक्षावर लावण्यात येणाऱ्या पिवळ्या व तांबडया रंगाचे रेडियम शासनमान्य ठेकेदाराकडून लावून घेत त्याबाबतचे सर्टिफिकेट असल्याशिवाय रिक्षा पासिंग न करण्याचा निर्णयाला सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेने कडाडून विरोध केला आहे. यविरोधात या संघटनेने आज आरटीओ कार्यालयात धडक देत उपप्रादेशीक परिवहन अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. तसेच रेडियमच्या नावाखाली होणारी लूट थांबविण्यात यावी आणि संबंधित शासन निर्णयाला स्थगिती दयावी अशी मागणी केली आहे. तसे न झाल्यास गणेश चतुर्थीनंतर जिल्ह्यातील सर्व रिक्षा बंद ठेवून आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन छेडू असा ईशाराही यावेळी दिला आहे.
रात्रीच्या वेळी मोठ्या वाहनांना रिक्षा दिसावी यासाठी आणि रिक्षा चालकांच्या सुरक्षेसाठी रिक्षेच्या मागे आणि पुढे पिवळा, सफ़ेद आणि लाल रंगाचे रेडियम लावण्यात यावे असे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. हे रेडियम शासनमान्य ठेकेदाराकडून लावल्यावर त्याबाबतचे सर्टिफिकेट असणाऱ्याच रिक्षांचे पासिंग करण्यात यावे असा शासन निर्णय आहे. मात्र या आदेशाची अंमलबजावणी करताना संबधित ठेकेदार हे १५० ते २०० रुपयांचे असताना सर्टिफिकेट सहित ६५० रूपये घेवून रिक्षा चालक मालक यांची लुबाडणूक करत आहेत तसेच स्वस्त दरात रेडियम मिळत असताना तेच रेडियम ठेकेदारामार्फत (एजंट) बसविण्याची आरटीओ कार्यालयामार्फत सक्ती केली जात असल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेने केला आहे.तसेच रिक्षावर लावण्यात येणाऱ्या पिवळ्या व तांबडया रंगाचे रेडियम शासनमान्य ठेकेदाराकडून लावून घेत त्याबाबतचे सर्टिफिकेट असल्याशिवाय रिक्षा पासिंग न करण्याचा निर्णयाला कडाडून विरोध करत या विरोधात या संघटनेने आज आरटीओ कार्यालयात धडक देत उपप्रादेशीक परिवहन अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. तसेच रेडियमच्या नावाखाली होणारी लूट थांबविण्यात यावी आणि संबंधित शासन निर्णयाला स्थगिती दयावी अशी मागणी केली आहे. तसे न झाल्यास गणेश चतुर्थीनंतर जिल्ह्यातील सर्व रिक्षा बंद ठेवून आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन छेडू असा ईशाराही यावेळी दिला आहे.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेनेचे जिल्हाध्यक्ष संजय शारबिद्रे, उपाध्यक्ष सुरेंद्र कोदे, सेक्रेटरी सुधीर पराडकर, राजन घाडी, नागेश ओरोसकर यांच्यासह अनेक रिक्षा चालक मालक उपस्थित होते.

4