तुळस काजरमळी येथील “त्या” पाच घरांना धोका भूगर्भशास्त्रज्ञाचा अहवाल:खासदार राऊतांचे मदतीचे आश्वासन

2

वेंगुर्ले : ता.२२
भूगर्भ शात्रज्ञ यांच्या आलेल्या प्रथमिक अहवालानुसार तुळस काजरमळी येथील एका घराला तर पलतड येथील चार घरांना धोका असून याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेण्यात येईल व ज्यांना कायमस्वरूपी स्थलांतरणाची आवश्यकता आहे त्यांना स्थलांतरित करण्यात येईल. तसेच डोंगर खचलेल्या ठिकाणी कोणत्या उपाययोजना करता येईल याचा भूगर्भ शात्रज्ञ यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यार असल्याची ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी तुळस येथे बोलताना दिली.
खासदार विनायक राऊत यांनी आज सर्वप्रथम तुळस येथे आपत्ती ग्रस्तांची भेट घेतली. तुळस काजरमळी येथील नुकसान झालेल्या माड, सुपारी बागायतींची पाहणी केली. यानंतर पलतड येथील स्थलांतरित ग्रस्तांची भेट घेतली आणि डोंगर खचलेल्या घटनास्थळी पाहणी केली.
यानंतर खासदार राऊत यांनी शिरोडा, आरवली आपत्तीग्रस्तांची भेट घेतली. यावेळी आपत्तीग्रस्तांनी खासदार राऊत यांच्यापुढे आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, सभापती सुनील मोरजकर, शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत परब, जि. प. सदस्य नागेंद्र परब, सार्वजनिक बांधकाम अभियंता आवटी, सर्कल जाधव, उपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्कर, अजित राऊळ, सचिन देसाई, महिला संघटक सुकन्या नरसुले, माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, उपतालुकाप्रमुख संजय गावडे, सचिन वालावलकर, युवा सेना अधिकारी पंकज शिरसाट, सावंतवाडी युवासेना प्रमुख सागर नाणोस्कर, मंजुषा आरोलकर, अजित राऊळ, आरवली सरपंच सुवर्णा आरोलकर, माजी सरपंच सायली आरोलकर, जिल्हा बँक संचालक राजन गावडे, शिरोडा ग्रा. प. सदस्य कौशिक परब, गोवा राज्य सहसंपर्क प्रमुख आदेश परब, चिपी सरपंच गणेश तारी यांच्यासहित इतर सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर खासदार राऊत यांनी चिपी येथील आपतग्रस्तांच्या भेटी घेतल्या.

8

4