शिवसहाय्य उपक्रमातंर्गत तोंडवळीतील पूरग्रस्तांना मदत…

247
2

शिवसेनेचा उपक्रम ; हरी खोबरेकर यांच्या हस्ते वितरण…

मालवण, ता. २३ : पूरपरिस्थितीमुळे आज अनेक संसार उद्ध्वस्त झाले. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अनेक ग्रामस्थांवर मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे राज्यातील पूरबांधितांसाठी शिवसेनेच्या माध्यमातून शिवसहाय्य उपक्रम राबविण्यात येत आहे. याच उपक्रमातंर्गत एक खारीचा वाटा म्हणून तोंडवळीतील पूरबांधितांना शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
तोंडवळीतील वाघेश्‍वर मंदिरात झालेल्या या कार्यक्रमास विभागप्रमुख उदय दुखंडे, सरपंच आबा कांदळकर, शाखाप्रमुख दिलीप पुजारे, हर्षद पाटील, उपसरपंच दशरथ वायंगणकर, प्रतीक्षा पाटील, प्रमोद पाटील, देवानंद पाटील, बंड्या खोत, शेखर तोंडवळकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

4