कदंबा कलंडल्याने आंबेलीत अपघात:सुदैवाने कोणी जखमी नाही

2

दोडामार्ग ता .२३:
बाजूने जाणाऱ्या गाडीला साईड देताना गोवा कदंबा बसला आंबेली केळीचे टेंब येथे कलंडल्याने अपघात झाला.यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही..ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.परिसरातील राज्यमार्ग खड्डेमय झाल्यामुळे तसेच बाजूला एका खाजगी मोबाईल कंपनीकडून चर खोदण्यात आल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही .परंतु रस्त्याच्या परिस्थितीकडे आता तरी प्रशासनाने व लोकप्रतिनिधी लक्ष द्यावे अशी मागणी लोकांकडून होत आहे.

13

4