Tuesday, March 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यास्मशानशेडचे काम मार्गी लावण्यासाठी प्रसंगी आंदोलन...

स्मशानशेडचे काम मार्गी लावण्यासाठी प्रसंगी आंदोलन…

योगेशं महाले यांचा इशारा:नगरपंचायतीच्या कारभाराबाबत नाराजी…

दोडामार्ग ता.२३: येथील नगरपंचयतीच्या वतीने शहरातील नागरिकांच्या सोयी साठी बांधण्यात येणाऱ्या स्मशानभूमी शेडचे काम मुदत संपली तरी अद्याप जैसे थेच असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या स्मशान शेडच्या हलगर्जी ठेकेदार व नगरपंच्यायत विरोधात उपोषण करणार सासल्याचा इशारा भाजपचे शहर अध्यक्ष योगेश महाले यांनी आज येथे आबोलताना दिला.दरम्यान या नगरपंच्यायतच्या भोंगळ कारभारा बाबत शहरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.असेही त्यांनी सांगितले.
दोडामार्ग शहरातील स्मशान शेडचे काम गेल्या एप्रिल महिन्यात सुरु करण्यात आले आहे.या कामाला चार महिन्याची मुदत देण्यात आली होती.मात्र ६ महीने उलटून सुद्धा या स्मशान शेडचे २५% देखील काम झाले नसल्याचे नीदर्षनास आले आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांनी झालेले प्रेत भर पावसात दहन करायचे तरी कसे? असा प्रश्न उपस्तित केला आहे.
त्याच प्रमाणे नगरपंच्यायत नगराध्यक्ष सौ.लीना कुबल यांनी आपल्या सवा वर्षाच्या कालखंडात नारळ फोडून कामांची उद्घाटने केली मात्र एकही काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या या नगराध्यक्ष पदा बाबत शहरात जोरदार चर्चा सुरु असल्याचे महाले म्हणाले. त्यामुळे नगराध्यक्ष कुबल यांनी उद्घाटने केलेली कामे पहिल्यांदा करून घ्यावी मगच दुसऱ्या कामाना हात घालावा असा टोला योगेश महाले यांनी लगावला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments