नारूर गोठोस वनविभागाच्या हद्दीत पोल्ट्री व्यावसायिकांचे “धुमशान”

2

मेलेल्या कोंबड्या टाकल्या: परिसरात दुर्गंधी, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

कुडाळ.ता,२३: नारुर गोठोस येथील वनविभागाच्या हद्दीत मेलेल्या बॉयलर कोंबड्या पोत्यातून टाकण्यात आल्या आहेत. हा प्रकार परिसरात व्यवसाय करणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांकडून सुरू आहे.त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.
याबाबत ग्रामपंचायत व आरोग्य विभाग अनभिज्ञ असून संबंधित जागा वनविभागाची असल्याचे सांगून एकमेकांकडे बोट दाखवत आहे. दरम्यान परिसरात असणारी दुर्गंधी लक्षात घेतात रोगराई होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे संबंधित घाण टाकणाऱ्या व्यावसायिकांच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.याबाबत वन अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या मात्र याची कोणीही दखल घेत नाही. त्यामुळे प्रसंगी आंदोलन करू असा इशारा वाडीतील ग्रामस्थ वामन नाईक, गजानन धुरी, मिलिंद धुरी आदींनी दिला आहे.

6

4