ग्रामसभा तहकूब करण्यावरून असनिये सरपंच व ग्रामस्थांत शाब्दिक वाद…

320
2
Google search engine
Google search engine

विकास कामांचे मुद्दे मांडू देत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप…

ओटवणे ता.२३: ग्रामसभा तहकूब करण्यावरून असनियेत शुक्रवारी सरपंच व ग्रामस्थांमध्ये वादाचा भडका उडाला.यावेळी शाब्दिक बाचाबाचीचे प्रकारही घडले.ग्रामस्थ आपली कामे टाकून ग्रामसभेला येतात,मात्र दरवेळी ग्रामसभा तहकूब दाखवून ग्रामस्थांना विकासकामांबाबतचे मुद्दे मांडू दिले जात नाहीत,असा आरोप यावेळी करण्यात आला.महत्वाची ग्रामसभा असनुही उपसरपंच व काही सदस्य अनुपस्थित राहिल्यानेही वाद निर्माण झाला.
शुक्रवारी सकाळी असनिये ग्रामपंचायतीत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.मात्र कोरम अभावी ग्रामसभा होणार नाही,असे सरपंच स्नेहल असणकर यांनी जाहीर करताच वादाचा भडका उडाला.काही ग्रामस्थांनी ग्रामसभा जाहीर करण्यावर तीव्र आक्षेप घेतला.ग्रामसभा असली की ग्रामस्थ आपली कामे टाकून येतात,मात्र कोरमचे कारण दाखवून सभा तहकूब केली जाते.तहकूब केलेली सभा मग पुढे केव्हा घेतात याची नीट माहिती काही ग्रामस्थांना दिली जात नाही.आम्हाला विकासकामांसह इतर मुद्दे मांडायचे आहेत,अशी मागणी करत दिपक सावंत, अक्षय सावंत, निलेश पोकळे यांनी सरपंच असणकर यांना धारेवर धरले.महत्त्वाची ग्रामसभा असूनही उपसरपंच व काही सदस्यांनी सभेस दांडी मारली,असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.तुम्ही सदरच्या सदस्यांवर अविश्वास ठराव आणा,आपण यात काही करू शकत नाही.ही सभा नियमानुसार कोरमअभावी होऊ शकत नाही,असे सरपंच सौ.स्नेहल असणकर यांनी स्पष्ट केले. पुढील ग्रामसभा 31 ऑगस्ट घेऊ,त्यावेळी तुम्ही तुमचे मुद्दे मांडा, असेही सरपंच असणकर यांनी जाहीर केले.