मालवणातील मच्छिमार महिलांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे…

2

मालवण ता.२३: दांडी येथील मच्छीमार महिलांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले.याचा लाभ अनेक महिलांनी घेतला.रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन चे प्रशिक्षक प्रवीण श्लोक यांनी महिलांना मार्गदर्शन केले.या प्रसंगी जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक पि.के गावडे,गीता चौकेकर,रविकिरण तोरसकर,राजश्री सामंत, राजेश कांबळे ,गणपत गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी महिलांनी आपत्कालीन परिस्थिती कोणती काळजी घ्यावी,घरांमध्ये गॅस सिलेंडर वापरताना कोणती काळजी घ्यावी,विहिरीमध्ये एखादी व्यक्ती पडल्यास त्याला कसे वाचवावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

4