ग्रामस्थांचा पुढाकार; बंद असलेली वाहतूक पुन्हा सुरळीत…
बांदा ता.२३: नेतर्डे-खोलबागवाडी रस्त्यावरील मोरी खचल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली. स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर ग्रामस्थानीच श्रमदानाने मोरीची दुरुस्ती करून रस्ता वाहतुकीस खुला केला.
दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने झालेल्या पाण्याच्या प्रवाहात मोरीची काही भाग वाहून गेला. त्यामुळे यावरून वाहतूक करणे धोकादायक बनले होते. अखेर ग्रामस्थांनीच श्रमदान करण्याचा निर्णय घेतला.
कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, सूरज कुबल, विकास कुबल, सागर कुबल, सुनील कुबल, महेंद्र कुबल, रामदास कुबल, सचिन कुबल, प्रमोद कुबल या युवकांनी श्रमदानाने कोसळलेल्या मोरीचा भाग दुरुस्त केला.