मनसेच्या रोजगार मेळाव्यात ३२ कंपन्यांची हजेरी…

2

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या हस्ते उद्घाटन…

महाराष्ट्र नवनिर्माण सेना,सिंधुदुर्ग आणि मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळ,कणकवली यांच्या माध्यमातून कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या मेळाव्यात तब्बल ३२ कंपन्यांनी हजेरी लावली.या मेळाव्याचे उद्घाटन माजी आमदार तथा मनसेचे नेते परशुराम उपरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर,धीरज परब,दया मेस्त्री,कुणाल कीनळेकर,प्रसाद गावडे,बाबल गावडे, बाळू नाईक, गणेश वाईरकर,आशिष सुभेदार,राजू कासकर,दत्ताराम चिंदरकर ,शैलेश नेरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या मेळाव्याला तब्बल साडे चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी आपली त्यातील साडेतीनशे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी नोंदणी केली आहे.सायंकाळपर्यंत नेमके किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या याचे चित्र स्पष्ट होणार आहे.असे श्री.उपरकर यांनी सांगितले.

2

4