श्री सद्गुरू संगीत विद्यालयाच्या वतीने आयोजन…
सावंतवाडी ता.२३: येथील श्री सद्गुरू संगीत विद्यालयाच्या वतीने रविवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी सार्वजनिक गणेशोत्सव हॉल,सालईवाडा येथे “गुरुवंदना” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम दोन सत्रात संपन्न होणार आहे.
यात पहिल्या सत्रात सकाळी १०:०० ते दुपारी १:०० या वेळेत उद्घाटन समारंभ,नवोदित विद्यार्थ्यांचे गायन वादनाचे सादरीकरण व गुरुपूजन आदींचा समावेश आहे.तर दुसऱ्या सत्रात सायंकाळी ५:०० ते ८:०० या वेळेत विद्यालयाच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे शास्त्रीय संगीताचे सादरीकरण होणार आहे.यावेळी संगीत रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन सद्गुरू संगीत विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे।