कित्येक वर्षांची प्रथा आजही तेवढ्याच उत्साहात सुरु
वेंगुर्ले.ता,२३: वेंगुर्ला तालुका स्कूल शाळा नं. १ मध्ये आज मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. कित्येक वर्षे शाळेत श्रीकृष्णाचे पूजन करण्याची सुरु असलेली ही अनोखी प्रथा आजही तेवढ्याच भक्तीभावाने सुरु आहे.
आज सकाळी वाजतगाजत तालुकास्कूलमध्ये श्रीकृष्णाची मुर्ती आणण्यात आली. त्यानंतर पुरोहितांकडून कृष्णाची विधीवत पूजा करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी भजन, गाणी आदी कार्यक्रम सादर केले. यावेळी शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी आरती, तिर्थप्रसाद असे कार्यक्रम झाले. उद्या वाजत गाजत ओहोळावर या श्रीकृष्णाचे विसर्जन केले जाणार आहे.