निरवडेतील बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला शेत विहिरीत…

2

सावंतवाडी ता.२३: निरवडे येथून बेपत्ता असलेल्या महेश काशीराम बाईत (३९) याचा मृतदेह शेत विहिरीत आढळून आला आहे.ही घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शोधकार्या दरम्यान तेथील नागरिकांच्या निदर्शनास आली.याबाबतची खबर निरवडे सरपंच प्रमोद गावडे यांनी पोलिसांना दिली.दरम्यान काल तो बेपत्ता असल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की,संबंधीत तरुण काल सकाळी घरात कोणालाही न सांगता बाहेर पडला.दरम्यान काल उशिरा पर्यंत तो घरी परतला नाही.त्याच्या नातेवाईकांनी त्याचा उशिरा पर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो आढळून आला नाही.दरम्यान आज पुन्हा शोध कार्य सुरू असतानाच त्याचा मृतदेह घरापासून १ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेत विहिरीत आढळून आला.त्याने मानसिक नैराश्येतून आत्महत्त्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.अधिक तपासासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

2

4