कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना वाभवे विकास मंडळ मुंबई यांचा आर्थिक मदतीचा हात

2

वैभववाडी.ता,२३: नैसर्गिक आपत्तीत संकटात सापडलेल्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना वैभववाडी येथील वाभवे विकास मंडळ मुंबई यांनी आर्थिक मदतीचा हात दिला आहे. नाम फाऊंडेशन ट्रस्टचे श्री राजीव सावंत यांच्याकडे ११ हजार रुपयाचा धनादेश पुरग्रस्तांसाठी मंडळाच्या पदाधिका-यानी सुपूर्द केला आहे. यावेळी मंडळाचे सचिव नितीन करकोटे, सदस्य अशोक इंदप, श्रीपाद कदम व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो- नाम फाउंडेशनकडे धनादेश सुपूर्द करताना वाभवे विकास मंडळाचे पदाधिकारी.

4