वेंगुर्ले पंचायत समिती गटविकास अधिकारी पदावर उमा पाटील हजर…

2

सभापती सुनील मोरजकर यांनी केले स्वागत…

वेंगुर्ले : ता.२३ वेंगुर्ले पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी उमा पाटील यांची नियुक्ती झाली आहे.त्यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
वेंगुर्ले प.स.चे गटविकास अधिकारी म्हणून आज उमा पाटील यांनी कार्यभार स्वीकारल्यावर त्यांचे स्वागत पंचायत समितीचे सभापती सुनील मोरजकर यांनी केले. यावेळी पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. श्रीमती उमा पाटील या यापूर्वी गटविकास अधिकारी पंचायत समिती गगनबावडा जिल्हा कोल्हापूर येथे कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांची बदली शासनाने गटविकास अधिकारी पंचायत समिती वेंगुर्ले येथे केलेली आहे. यावेळी सभापती श्री.मोरजकर यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्याच प्रमाणे तालुक्‍याच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

4

4