कुडाळमध्ये एकमेव राजकीय दहिहंडी
सिंधुदुर्गनगरी,ता,२३:मुंबई, ठाण्याप्रमाणेच उंचच उंच दहीहंडी फोडण्याचा थरार आता सिंधुदुर्गवासीयांना शनिवारी बघायला मिळणार आहे. जिल्हयात १४७ सार्वजनिक आणि १ राजकीय अशा एकूण १४८ हंडया फोडल्या जाणार आहे. गतवर्षी जिल्ह्यात ११ राजकीय दही हंडया होत्या. मात्र यावर्षी कुडाळ तालुक्यातील १ राजकीय दही हंडी वगळता अन्य राजकीय पक्षांच्या दही हंडीचा निधी पुरग्रस्तांना दिला जाणार असल्याने त्या ठिकाणी राजकीय दही हंडी फूटणार नसल्याचे तेथील मंडळांनी स्पष्ट केले आहे.
पूर्वी मुंबई आणि ठाणे अशा मोठ्या शहरांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा दहीहंडी उत्सव आता गावागावात मोठ्या उत्साहाने साजरा केला जोतो. त्यासाठी जिल्ह्यातील गोविंदा पथक सज्ज झाली आहेत. या पथकांनी उंच उंच असलेली दहीहंडी फोडता यावी यासाठी सरावही केला आहे. ही पथके आता उद्या शनिवारी जिल्ह्यात ठीक ठिकाणी बांधण्यात येणारी दहीहंडी फोडण्यासाठी जाणार आहेत. काही ठिकाणी तर या उत्सवात आनंदाचा भर पडावा यासाठी ढोल पथक, डीजे आदी लावण्यात येणार आहेत. या डीजे व ढोल पथकांच्या सुरावर जिल्ह्यातील गोंविंदा, नागरिक आणि दहीहंडी उत्सव प्रेमी थिरकणार आहेत. दहिहंडीचे विविध कार्यक्रम विविध संस्थांनी, तसेच गावोगावी स्थानिक मंडळांनी आयोजित केले आहेत.
जिल्हयात १४७ सार्वजनिक आणि १ राजकीय अशा एकूण १४८ हंडया फोडल्या जाणार आहे. पारंपरिक सणाचा आविष्कार वाढवण्यासाठी ‘दहीकाला उत्सवा’निमित्त गोविंदांवर लाखो रुपयांच्या बक्षिसांची खैरात होणार आहे.
अन्य राजकीय दहीहंडीचा निधी पुरग्रस्तांना
जिल्ह्यात शनिवारी दही हंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे या निनिमित्त जिल्ह्यात कुडाळमध्ये शिवसेना पक्षाची राजकीय एक दही हंडी फुटणार आहे. तर उर्वरित ठिकाणच्या सर्व राजकीय पक्षांच्या दही हंडीचा निधी जिल्ह्यातील पुरग्रस्तांना देण्याचा निर्णय त्या त्या मंडळांनी घेतला आहे.
१४७ ठिकाणी सार्वजनिक दहीहंडया
जिल्ह्यात १४७ सार्वजनिक ठिकाणी दहीहन्ड्या फोडल्या जाणार आहेत. यात सावंतवाडी- १९, दोडामार्ग- ३, बांदा- ३, वेंगुर्ला- २२, निवती- ४, कुडाळ- ५, सिंधुदुर्गनगरी- १६, कणकवली- २२, देवगड- १०, आचरा- ४, विजयदुर्ग ९, वैभववाडी- ७, मालवण- २३