शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करा…. शिक्षक संघाची पालकमंत्र्यांकडे मागणी: २००५ च्या नंतरच्या शिक्षकांचा समावेश

2

सिंधुदुर्गनगरी ता.२३
२००५  नंतर नियुक्त केलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष देवीदास बसवदे यांनी गृह,वित्त व नियोजन राज्य मंत्री दिपक केसरकर यांची मुंबई येथे भेट देऊन निवेदन सादर केले. यावेळी उपसरचिटणीस कल्याण लवांड व राज्य संयुक्त चिटणीस महादेव देसाई उपस्थित होते.
शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी शासनाकडे शिक्षक संघाच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. शिक्षकांच्या भवितव्यासाठी जुनी पेन्शन योजनाच लाभदायक आहे. नवीन पेन्शन योजना ही समान काम समान वेतन या नैसर्गिक योजनेमुळे अनेक मृत शिक्षक कर्मचा-यांचे संसार उघडय़ावर पडले आहेत. दिल्ली सरकारने पुन्हा जुनी पेन्शन योजना सुरू केली आहे. तर बिहार, कर्नाटक या राज्यांमधे ही योजना सुरू करण्यास तेथील शासनाने अनुकूलता दर्शविली आहे. या शिक्षकांना 1983 च्या फॅमिली पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही. त्याच प्रमाणे ग्रॅच्युइटीचा लाभ या कर्मचा-यांना मिळत नाही. याचा विचार करून 2005 नंतरच्या सर्व शिक्षकांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी अशी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.

2

4