वैभव नाईक; खासदार राऊत,पालकमंत्री केसरकर राहणार उपस्थित…
कणकवली, ता. २३ : ऑल इंडिया फार्मासिस्ट कॉन्सिल व डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठ आणि एआयसीटीइ मान्यताप्राप्त विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीचा शुभारंभ बुधवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा.शिरवल येथे खास.विनायक राऊत व पालकमंत्री नाम. दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती युवक कल्याण संघ कणकवलीचे संस्थापक अध्यक्ष आम. वैभव नाईक व प्रा. मंदार सावंत यांनी दिली.
कणकवलीपासून अवघ्या 3 कि.मी. अंतरावर असलेल्या कणकवली-हळवल मार्गावरील शिरवल येथे विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीची भव्य-दिव्य ईमारत साकारण्यात आली आहे. युवक कल्याण संघ कणकवलीच्या माध्यमातून गेली काही वर्षे विविध उपक्रम सुरु असून याच संस्थेच्या माध्यमातून हे शिक्षणाचे दालन उभे राहिले असल्याचे आम. वैभव नाईक यांनी सांगितले. शिरवल येथील या कॉलेजच्या ईमारतीची पाहणी केल्यानंतर आम. वैभव नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत संचालक महेश देसाई, संजय ढेकणे, भास्कर राणे, उत्तम राणे, यांच्यासह प्रा.मंदार सावंत, प्रा. मेघा रमण बाणे, प्रा. पुजा पटेल, प्रा. जागृती राणे उपस्थित होते.
विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, गौरीशंकर खोत, पुष्पसेन सावंत, संदेश पारकर, सतिश नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सांगताना आम. वैभव नाईक म्हणाले डॉ. रमण बाणे व प्रा. मंदरा सावंत यांच्या सहकार्यातून या शैक्षणिक वाटचालीला सुरुवात झाली आहे. पहिल्या वर्षी बॅचलर ऑफ फार्मसी व डिप्लोमा इन फार्मसीचे वर्ग सुरु होत असून या अभ्यासक्रमांना शासनाच्या सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाल्या आहेत. बी. फार्मा व डी. फार्मा अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या डि.टी.ई विभागाच्या माध्यमातून पुर्ण झाली असून पहिली बॅच यावर्षी सुरु होत आहे असे सांगतानाच आम. वैभव नाईक म्हणाले शिक्षण क्षेत्राबाबत कै. विजयराव नाईक यांचा नेहमीच सकारात्मक भुमिका राहिली आहे. विविध शिक्षण संस्थाना त्यांनी मदत केली होती. त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठीच विजयराव नाईक यांच्या नावाने हे कॉलेज सुरु करत आहोत. सिंधुदुर्गाच्या शैक्षणिक वाटचालीत सहभागी असलेल्यांनी या शैक्षणिक उपक्रमात सहभाग घ्यावा असे सांगतानाच या पुढच्या काळात विविध अभ्यासक्रम संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. केंद्र सरकारचे विविध अभ्यासक्रम या ंसंस्थेस डॉ. रमण बाणे व प्रा. मंदार सावंत यांच्या माध्यमातून सुरु होतील. शिक्षणासाठी लागेल ती सर्व मदत उपलब्ध केली जाईल असे आम.वैभव नाईक यांनी सांगितले.
विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये पहिल्या वर्षी दहा उच्च शिक्षित प्राध्यापकांची नेमणुक करण्यात आली असून 75 लाखाची उपकरणे आणण्यात आली आहेत. कॉजेल सुरु झाल्यापासूनच सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून प्राचार्य म्हणून डॉ.सुप्रिया हयाम यांची नेमणुक करण्यात आली असल्याचे प्रा.मंदार सावंत यांनी सांगितले.