लक्ष्मण ठुकरूल यांचा मृतदेह ओढ्यात सापडला

211
2

कणकवली, ता.२३: तालुक्यातील माईण येथून 15 ऑगस्ट पासून बेपत्ता असलेल्या लक्ष्मण बाळा ठुकरूल (वय 70) यांचा आज मृतदेह सापडला. भरणी चाफेड सीमेवरील ओढ्याच्या पात्रात बंधार्‍याला अडकलेल्या स्थितीत आज दुपारी ते स्थानिकांना ते दिसून आले. नातेवाइकांनी मृतदेहाची पाहणी केल्यानंतर तो लक्ष्मण ठुकरूल यांचा असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. लक्ष्मण ठुकरूल यांना दोन मुलगे, सुना, विवाहित मुलगी असा परिवार आहे.

4