राणेंना त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करायचाय : देवेंद्र फडणवीस

2

पुणे : माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे येत्या आठवडाभरात मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा होती. खुद्द राणे यांनीच तसे भाष्य केले होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण केले आहे. फडणविसांच्या म्हणण्यानुसार राणेंना त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा भाजपमध्ये विलीन करायचा आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सांगितले. मुख्यमंत्री हे सध्या महाजनादेश यात्रेत उत्तर महाराष्ट्रात आहेत. तेथून त्यांनी ही मुलाखत दिली. मुख्यमंत्री हे नारायण राणे यांच्या झंझावात या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला उपस्थित नव्हते. त्यावरही प्रश्न विचारण्यात आले.

मुख्यमंत्री म्हणाले की मला नारायण राणेंनी पुस्तक प्रकाशनाला बोलावले होतं. पण त्यांनी सांगितलेल्या वेळेत मला जाणं शक्य झालं नाही. राणे आमच्यासोबतच आहेत. राणेंनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय त्यांच्याशी चर्चा करुन घेतला. राणेंना आपला पक्ष भाजपात विलीन करायचा आहे.

मला पक्ष जेव्हा सांगेल तेव्हा माझी दिल्लीत जाण्याची तयारी आहे असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. तसेच राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भाजपमध्ये आले तर आनंदच होईल, अशीही पुस्ती त्यांनी जोडली.

7

4