मी काही काळच राज्यात : मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ

295
2

पुणे : मी काही काळ राज्यात आहे, मला पक्ष जेव्हा सांगेल तेव्हा माझी दिल्लीत जाण्याची तयारी आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला पुढील टप्पा स्पष्ट केला आहे.

अर्थात मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपमधील मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असलेल्यांना उत्साह संचारला असेल. मात्र काही काळ यात किती दिवस मोजायचे, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले नसल्याने या इच्छुकांना वाट पाहावी लागणार आहे. महाजनादेश यात्रेवर उत्तर महाराष्ट्रात असलेल्या मुख्यमंत्र्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपले पुढचे ठिकाण सांगितले.

4