नगराध्यक्षांच्या मानधनात घसघशीत वाढ

195
2
Google search engine
Google search engine

मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश;नगरसेवकांच्या मानधनाबाबत अदयाप धोरण नाही

सावंतवाडी/ अमोल टेंबकर नगराध्यक्षांच्या मानधनात अखेर शासनाने भरघोस वाढ केली आहे. यात अ वर्ग नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना मासिक 25 हजार तर क वर्ग नगरपालिकेच्या नगराध्यक्षांना 15 हजार रूपये असे मानधन असणार आहे. त्याचबरोबर वार्षिक अतिथी भत्ता देण्यात येणार आहे. नगराध्यक्षांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लागला असला तरी अद्यापपर्यंत नगरसेवकांच्या मानधन वाढीबाबत शासनाने कोणतेही धोरण जाहीर केले नाही.आज याबाबतचा अध्यादेश शासनाकडून जाहीर करण्यात आला यात नगराध्यक्षांच्या मानधनात वार्षिक अतिथी भत्त्यात वाढ करण्यात आल्याचे म्हटले आहे.
त्यात अ वर्ग नगरपालिकेच्या नगराध्यक्षासाठी 25 हजार ब वर्गसाठी 20 हजार तर क वर्ग साठी 15 हजार मानधन मिळणार आहे. तर वार्षिक अतिथी भत्ता म्हणून अ वर्ग पालिकेसाठक 36 हजार,ब वर्ग 24 हजार, क वर्ग 18 हजार असा खर्च देण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे सहसचिव संजय गोखले यांनी म्हटले आहे