कणकवली-नरडवे नाक्यावर पोलिसांची दंगाकाबू मोहीम

2

कणकवली, ता.23 ः नरडवे नाक्यावर जातीय दंगल पेटली या वृत्तानंतर कणकवली पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेतली. सायंकाळी साडे चारच्या सुमारास पोलिसांची एक तुकडी अचानकपणे नरडवे नाक्यावर आली होती. पोलिस वाहनातून आलेल्या या पोलिस तुकडीने नरडवे नाक्यावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे नागरिकांसह वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मोहरम आणि गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्‍वभूमीवर ही दंगा काबू मोहिम राबविण्यात आल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

4