Tuesday, February 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यापदवीधर मतदारसंघाची १५ हजार १५४ मतदारांची प्रारूप यादी जाहीर...

पदवीधर मतदारसंघाची १५ हजार १५४ मतदारांची प्रारूप यादी जाहीर…

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती; ९ डिसेंबरपर्यंत हरकती घेता येणार…

ओरोस,ता.२८: कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. यात १५ हजार १५४ मतदारांचा समावेश आहे. यातील ९ हजार ३८ पुरुष तर ६ हजार ११६ महिला मतदारांचा समावेश आहे. या यादीवर ९ डिसेंबरपर्यंत हरकती नोंदविता येणार आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांनी दिली.
निवडणूक आयोगाच्या जाहीर कार्यक्रमानुसार जिल्ह्यात कोकण पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू आहे. मागील निवडणुकीत जिल्ह्यात केवळ ५ हजार ३०८ मतदार निश्चित झाले होते. यावर्षी मात्र यात जवळ जवळ तिप्पट वाढ झाली आहे. जिल्हाधिकारी बैठक सभागृहात जिल्हाधिकारी तावडे यांनी पत्रकार परिषद घेवून ही माहिती दिली. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी तावडे यांनी, कोकण पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याबातचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्याअनुषंगाने २३ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्ह्यातील सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तसेच सर्व पदनिर्देशित अधिकारी, अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी यांचे कार्यालय येथे प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेली असून या मतदार यादीमध्ये आपले नाव दाखल करण्याचे राहून गेल्यास किंवा दुरुस्ती करावयाची असल्यास दावे व हरकती दाखल करण्याचा कार्यक्रम अंतर्गत २३ नोव्हेंबर २०२३ ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये दावे व हरकती दाखल करू शकतात. तरी जास्तीत जास्त पात्र पदवीधर मतदारांनी प्रसिद्ध करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी पडताळणी करून या मतदार यादीत आपले नाव नसल्यास विहित नमुन्यातील नमुना नंबर १८ विहित कागदपत्रांसह भरून ऑनलाईन अथवा ऑफलाईन माध्यमातून पदनिर्देशित अधिकारी किंवा अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी यांचे कार्यालय येथे जमा करावे, असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments