माफी मागा, अन्यथा जाहिर धिंड काढू, महिला भाजप आक्रमक…

40
2

संध्या तेरसेंचा जान्हवी सावंतांना इशारा; “ती” भाषा संस्कृतीला शोभत नाही…

कुडाळ,ता.२८: देशाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवराळ भाषा वापरणाऱ्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी जान्हली सावंत यांनी तात्काळ जाहिर माफी मागावी, अन्यथा भाजपच्या महिला आघाडीच्या माध्यमातून त्यांची धिंड काढण्यात येईल, असा इशारा भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषद दिला.
दरम्यान सावंत यांनी वापरलेली भाषा सिंधुदुर्गच्या संस्कृतीला शोभत नाही. त्यांनी समस्त महिला जातीचा अपमान केला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. सावंत यांनी मुंबई येथे झालेल्या कोकणी मेळाव्यात पंतप्रधान मोदींच्या विरोधात शिवराळ भाषा वापरली होती. या पार्श्वभूमीवर महिला आघाडीच्या माध्यमातून त्यांना इशारा देण्यात आला आहे. यावेळी प्रज्ञा राणे, विशाखा कुलकर्णी, मुक्ती परब, रेखा काणेकर, साधना माडये, रेवती राणे आदी उपस्थित होत्या.
सौ. तेरसे पुढे म्हणाल्या, मोदी हे महिला सन्मान योजना जनतेपर्यंत पोहोचवत आहेत आणि त्यांना महिलेच्या तोंडातून शिवीगाळ केली जाते हे खपवून घेतले जाणार नाही. स्वतःच्याच गावात एकही सीट निवडून आणण्याची क्षमता नसलेल्या बाईने असे वक्तव्य करणे योग्य नाही. त्यामुळे लवकरात-लवकर जाहिर माफी मागावी अन्यथा त्यांची भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या माध्यमातून जाहिर धिंड काढण्यात येईल, असे ही त्या म्हणाल्या.

4