मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आरटीओ शिबिराच्या वेळेत बदल…

11
2

सावंतवाडी,ता.२८: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत ४ डिसेंबरला नौसेना दिन साजरा करण्यात येणार असल्याने या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने देवगड व कणकवली येथे आयोजित होणाऱ्या शिबिरांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.
नौसेना दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिमहनीय व्यक्ती, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे देवगड येथील ४ डिसेंबरला होणारे शिबीर रद्द करून ८ डिसेंबरला तर कणकवली येथील ५ डिसेंबरचे शिबीर रद्द करून १२ डिसेंबरला आयोजित करण्यात आले आहे. याबद्दलची वाहन चालकांनी नोंद घेण्याचे आवाहन श्री. काळे यांनी केले आहे.

4