संविधान बचाव यात्रेचे वैभववाडीत जल्लोषात स्वागत…

7
2

वैभववाडी, ता.२८: डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातु व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या संविधान बचाव याञेचे कोल्हापूर येथुन सायंकाळी वैभववाडी येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे येथील संभाजी चौकात जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, सरचिटणीस संजीवजी बोधनकर, यांचे आगमन झाले.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण जाधव, अनिल तांबे, धनाजी जाधव, प्रकाश करुळकर, तानाजी कांबळे, वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव, सरचिटणीस रविंद्र पवार,रुपेश कांबळे, मंगेश कांबळे  वैभववाडीचे जेष्ठनेते सज्जनकाका रावराणे,काॕग्रेस युवक तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, अशोक राणे, विनोद कदम, सुधीर जाधव, रविंद्र तांबे, प्रितम जाधव, सुहास जाधव, यांच्यासह मोठ्या संख्येने आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

4