व्हिडीओ शूटिंग करणे पडले महागात…

141
2
Google search engine
Google search engine

सर्जेकोट सुवर्णकडा समुद्रात युवक पडला ; स्थानिकांनी वाचवले, अधिक उपचार सुरु…

मालवण, ता. २८ : तालुक्यातील कोळंब सर्जेकोट मार्गावरील सुवर्णकडा येथे व्हिडिओ शुटिंग करण्यास गेलेला एक युवक कड्यावरून थेट समुद्रात खडकात पडल्याची घटना सायंकाळी उशिरा घडली. त्याला वाचविण्यात स्थानिकांना यश आले आहे. गंभीर जखमी झाल्याने त्या युवकाला ग्रामीण रुग्णालय येथे उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

सेंटरिंग करणारे काही युवक (मूळ रा. पश्चिम बंगाल) हे फिरण्यासाठी व फोटो व्हिडिओ काढण्यासाठी सर्जेकोट येथे आले होते. ते सर्जेकोट सुवर्णकडा येथे व्हिडीओ शूटिंग करताना एक युवक तोल जाऊन थेट समुद्रात कोसळला. यात तो युवक गंभीर जखमी झाला. हा प्रकार लक्षात येताच कोळंब गावातील संतोष शेलटकर आणि प्रेमानंद पराडकर या तरुणांनी छोटी होडी घेऊन त्याला वाचविले. त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.