तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत चार शाळांना संमिश्र यश…

213
2

मालवण, ता. २३ : तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल, भंडारी हायस्कूल, टोपीवाला हायस्कूल, जय गणेश इंग्लिश मिडियम स्कूल यांना संमिश्र यश मिळाले.

  • तालुका क्रीडा समितीच्यावतीने लक्ष्मीबाई टोपीवाले कन्याशाळेच्या मैदानावर तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी तालुका क्रीडा समन्वयक अजय शिंदे, सुरेंद्र सकपाळ, मुख्याध्यापक लक्ष्मण शिंदे, जयसिंग पाटील, श्‍वेता राळकर, रामभाऊ पेडणेकर, नितीन हडकर, शंकर पराडकर, राजू परब, श्रीनाथ फणसेकर, राजू देसाई, रूपेश खोबरेकर, वीरेन वालावलकर, सौ. वैशाली चव्हाण, संतोष गावडे, बाबू सकपाळ, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू मंदार ओरसकर, रेनॉल्ड भुतेलो, नागेश कदम, प्रवीण साबळे आदी उपस्थित होते.
    यावेळी राज्यपंच नितीन हडकर, मंदार ओरसकर यांचा बाळासाहेब पंतवालावलकर, सुरेंद्र सकपाळ यांच्या हस्ते हॉटन व्हीसल देऊन सन्मान करण्यात आला. राज्य, विभागीय, जिल्हा, तालुका स्पर्धा आयोजनासाठी मैदान, निवास व्यवस्था संस्थेच्यावतीने मोफत उपलब्ध करून दिले जाईल असे आश्‍वासन श्री. पंतवालावलकर यांनी दिले. राष्ट्रीय खेळाडू राजा देसाई, त्रिंबक माध्यमिक शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रताप बागवे, हेमंत प्रभू, शिवराम सावंत, उत्तम पेडणेकर यांनी स्पर्धेस भेट देत शुभेच्छा दिल्या.
    स्पर्धेचा निकाल असा- १४ वर्षे मुली- प्रथम- डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल, द्वितीय- भंडारी हायस्कूल, तृतीय- श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट, मुलगे- प्रथम- भंडारी हायस्कूल, द्वितीय- न्यू इंग्लिश स्कूल आचरा, तृतीय- डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल, १७ वर्ष मुली- प्रथम- जयगणेश इंग्लिश मिडियम स्कूल, द्वितीय- डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग, तृतीय- टोपीवाला हायस्कूल, मुलगे- प्रथम- टोपीवाला हायस्कूल, द्वितीय- भंडारी हायस्कूल, तृतीय- वराडकर हायस्कूल कट्टा, १९ वर्ष मुली- प्रथम- टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालय, द्वितीय- न्यू इंग्लिश स्कूल आचरा, तृतीय- भंडारी हायस्कूल, मुलगे- प्रथम- भंडारी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय, द्वितीय- टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालय, तृतीय- वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय.
    स्पर्धेत पंच म्हणून रामभाऊ पेडणेकर, नितीन हडकर, रेनॉल्ड भुतेलो, मंदार ओरसकर, संकेत जाधव, प्रथमेश आढाव, सौगंधराज बादेकर, सागर कुर्लेकर, अमित मांजरेकर, आनंद मांजरेकर, अविनाश खडपे, दिनेश सावंत, रवी घेवडे, लक्ष्मण बांगारे, रूपेश खोबरेकर, ओंकार यादव, सुरेंद्र सकपाळ, अरविंद जाधव, निशाकांत पराडकर, तन्वी चव्हाण यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वितेसाठी दिलीप देवगडकर, महादेव गावकर, श्रीकांत आटक, श्रीमती घडशी यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक लक्ष्मण शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण साबळे यांनी केले. श्रीमती राऊळ यांनी आभार मानले.
4