मालवण, ता. २४ : येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालय वायरी येथे तालुका क्रीडा समितीच्यावतीने घेतलेल्या शालेय खो-खो स्पर्धेत चौदा, सतरा वर्षाखालील मुलामुलींच्या गटात श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाने विजेतेपद पटकावीत निर्विवाद वर्चस्व राखले.
स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय खो-खो खेळाडू श्रीनाथ फणसेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी तालुका समन्वयक अजय शिंदे, जयसिंग पाटील, तानाजी वाघमारे, प्रवीण कुबल, संदीप कोळापट्टे, शैलेश मुळीक, पंकज राणे, राजू देसाई आदी उपस्थित होते. स्पर्धेस खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेचा निकाल असा- १४ वर्षाखालील मुलगे- प्रथम- श्री रेकोबा माध्यमिक विद्यालय वायरी मालवण, द्वितीय- सौ. ही. भा. वरसकर हायस्कूल वराड, तृतीय- भंडारी हायस्कूल, मुली- प्रथम- श्री रेकोबा माध्यमिक विद्यालय वायरी, द्वितीय- भ. ता. चव्हाण माध्यमिक विद्यालय चौके, तृतीय- भंडारी हायस्कूल, १७ वर्षाखालील मुले- प्रथम- श्री रेकोबा माध्यमिक विद्यालय वायरी, द्वितीय- भंडारी हायस्कूल, तृतीय- सौ. ही. भा. वरसकर हायस्कूल वराड, मुली- प्रथम- श्री रेकोबा माध्यमिक विद्यालय वायरी, द्वितीय- भंडारी हायस्कूल, तृतीय- सौ. ही. भा. वरसकर हायस्कूल वराड, १९ वर्षाखालील मुले- प्रथम- सौ. ही. भा. वरसकर हायस्कूल वराड, द्वितीय- ना. अ. देसाई टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालय, तृतीय- भंडारी कनिष्ठ महाविद्यालय, मुली- प्रथम- ना. अ. देसाई टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालय
स्पर्धेत पंच म्हणून पंकज राणे, शैलेश मुळीक, विशाल भगत, करण पाटील, ताराचंद्र पाटकर, अक्षय घाडी यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वितेसाठी यशवंत गावकर, दत्ता गोसावी, अशोक सारंग यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अजय शिंदे यांनी केले. प्रवीण कुबल यांनी आभार मानले.