राणे प्रकरण हा विषय शिवसेनेसाठी केव्हाच संपला… विनायक राऊत:याबाबत पक्षप्रमुख ठाकरे योग्य तो निर्णय घेतील…

2

वैभववाडी/पंकज मोरे
नारायण राणे हा विषय शिवसेनेसाठी केव्हाच संपला आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशाबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे याबाबत आपण काही बोलणार नाही असे मत खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी येथे व्यक्त केले.
श्री राऊत हे वैभववाडी रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांनी राणे यांच्या भाजप प्रवेशाबाबत मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे.तसेच शिवसेनेशी चर्चा करून उचित निर्णय घेवू असे म्हटले आहे.याबाबत त्यामुळे तुमचे म्हणणे काय असा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाचे उत्तर देताना श्री राऊत म्हणाले नारायण राणे प्रकरण हे शिवसेनेसाठी केव्हाच संपलेला आहे त्यांना भाजपात घेण्यासंदर्भात चा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख यांचा आहे त्यामुळे यावर आपण जास्त काही बोलणार नाही असे त्यांनी सांगितले

12

4