दिनेश नागवेकर यांना बांधकाम क्षेत्राची पीएचडी प्रदान

2

सावंतवाडी ता.२४:येथील बांधकाम व्यावसायिक घरकुल कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा दिनेश नागवेकर यांना जर्मनीच्या इंटरनॅशनल पीस युनिव्हर्सिटी कडून बांधकाम क्षेत्रातील पीएचडी प्रदान करण्यात आली.नुकतेच गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार अर्पण करण्यात आला.
यावेळी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी चे सल्लागार डॉक्टर डी. ला.पोमेराई, गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष मांगिरीश रायकर, सीबीआय चे माजी संचालक व्ही एन सैगल, विद्यापीठाचे निमंत्रक डॉक्टर जी.एस सचदेव आदी उपस्थित होते.श्री.नागवेकर गेली अनेक वर्षे बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत.या क्षेत्रात चाळीस वर्षाचा त्यांना अनुभव आहे.

130

4