सावंतवाडीत अल्पवयीन मुलीचे अपहरण…?

15
2

बनाव की अन्य काही कारण; तक्रार नसल्याचे पोलिसांचे म्हणणे…

सावंतवाडी,ता.०१: शहरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची चर्चा आहे. सकाळी हा प्रकार घडला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. मात्र असा काहीच प्रकार घडला नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे अपहरण की बनाव हे नेमके स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबतची माहिती एका जागरूक नागरिकाकडून ब्रेकींग मालवणीला देण्यात आली.

त्याच्या म्हणण्यानुसार संबंधित मुलगी ही शाळेत जात होती. यावेळी शहरातील एका परिसरात मास्क लावून आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी तिला आपल्या गाडीत कोंबले आणि तुझ्या आई बाबांचे नाव काय? बहिणीचे नाव काय? अशी विचारणा केली आणि त्यानंतर आपल्याला अडीच तासाने आणून सोडले. याबाबतची तक्रार संबंधित मुलीने दिल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली, असे त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान चौकशी अंती असा काहीच प्रकार घडला नाही, असे पोलिसांचे म्हणणे. याबाबत ठाणे अंमलदार हनुमंत धोत्रे यांचे संपर्क साधला असता त्यांनी अधिक तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत इंगवले हे गेले होते असे त्यांनी सांगितले. इंगवले यांच्याशी संपर्क साधला असता आपण त्या मुलीशी चर्चा केली. मात्र तसा कोणताही प्रकार घडला नाही, आपण तिच्याशी स्वतः बोललो चौकशी अंती कोणताही प्रकार उघड झाला नाही. याबाबत कोणाची तक्रार नाही असे त्यांनी सांगितले. त्यामुळे याबाबत पोलीस ठाण्यात काही नोंद नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र हा बनाव होता की अपहरण याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही. अधिक माहितीसाठी पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता आपण मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाहेर होतो. त्यामुळे नेमके काय घडले हे आपल्याला माहिती नाही परंतु चौकशी करतो, असे त्यांनी सांगितले.

4