शिरोडा येथील काॅग्रेसची दहीहंडी रद्द:पूरग्रस्तांना मदत दिली

2

शिरोडा ता २४ : राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या दहीहंडीची रक्कम कोल्हापूर सांगली येथील पूरग्रस्तांना देण्यात आली. त्यामुळे दरवर्षी होणारी दहीहंडी रद्द करण्यात आली आहे अशी माहिती आयोजकांच्यावतीने सिद्धेश परब यांनी दिली.
शिरोडा येथे गेली कित्येक वर्ष राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत व सिद्धेश परब आणि मित्र मंडळ आयोजित दहीहंडी स्पर्धा असायची. परंतु या चालू वर्षी ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी येणारा खर्च, बक्षीस रक्कम व इतर खर्च पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर-सांगली येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. त्या स्वच्छता मोहीममध्ये आम्ही सर्वजण सहभागी होऊन पुरग्रस्तांना मदत केली, अशी माहिती श्री. परब यांनी दिली.

16

4