Sunday, January 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामध्यप्रदेश राजस्थान मधील विजयानंतर बांद्यात फटाक्यांची आतिषबाजी...

मध्यप्रदेश राजस्थान मधील विजयानंतर बांद्यात फटाक्यांची आतिषबाजी…

बांदा ता.०३: मध्यप्रदेश, राजस्थान व छतीसगड या तीन राज्यात भाजपाची एकहाती सत्ता आल्यानंतर रविवारी बांदा कट्टाकॉर्नर चौकात भाजपा पदाधिकारी व कार्यकत्यांनी फटाक्यांची आतषबाजी व घोषणाबाजी करीत जल्लोष केला.

छतीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश व तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज करण्यात आली. मतमोजणी टप्प्या टप्प्याने जाहीर होताच राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यात भाजपने आघाडी घेतली आणि भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. तीन राज्यात भाजपने मुसंडी मारीत बहुमत मिळविल्यानंतर बांदा कट्टा कॉर्नर येथे पदाधिकारी व कार्यकत्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. तसेच वंदे मातरम, भारत माता की जय, पंतप्रधान नरेंद्र मोदी आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा विजयी घोषणा दिल्यात. मोदींप्रमाणेच भारतीय जनता पक्षाच्या विजयी घोषणा दिल्या. यावेळी सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती शीतल राऊळ, बांदा उपसरपंच जावेद खतीब, कास सरपंच प्रविण पंडित, माजी सरपंच मंदार कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, रत्नाकर आगलावे, श्याम मांजरेकर, भाजप शहराध्यक्ष बाबा काणेकर, दशरथ घाडी, शैलेश केसरकर, सुधीर शिरसाट, सागर सावंत, संदीप बांदेकर, दर्पण आळवे, सुधीर शिरसाट, साईनाथ धारगळकर, सुनील धामापूरकर, केदार कणबर्गी, नितेश पेडणेकर, संदीप बांदेकर, सागर सावंत, सिद्धेश नाईक, रोहिदास कळंगुटकर, अथर्व पावसकर आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments