तिथवली येथील दिर्बादेवी सोसायटीचे माजी चेअरमन सत्तार काझी यांचे निधन

235
2
Google search engine
Google search engine

वैभववाडी.ता,२४: तिथवली येथील दिर्बादेवी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सत्तार कादीर काझी वय ७५ वर्षे रा. तिथवली यांचे प्रदिर्घ आजाराने शुक्रवारी राहत्या घरी निधन झाले.
तिथवली सज्जाचे कोतवाल सलीम काझी यांचे ते वडील होतं. तर जि. प. चे माजी उपाध्यक्ष नासीर काझी यांचे ते चुलते होतं. सत्तार काझी यांनी चेअरमन पदाच्या कार्यकाळात तिथवली व आसपासच्या गावात सहकार चळवळीचे महत्व शेतक-यांना पटवून दिल्याने सोसायटीच्या सभासदत्वाचे प्रमाण वाढण्यास मोलाची मदत मिळाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कोळपे-भुसारवाडी येथील कब्रस्तानात दफनविधी पार पाडण्यात आला.