वेंगुर्ले ता.०३: भाजपाने मध्यप्रदेश,राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळविल्याने आज सायंकाळी वेंगुर्ले येथे भाजपा तर्फे फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला.
वेंगुर्ले भाजप कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या जल्लोषावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, ऍड.सुषमा प्रभूखानोलकर, तालुकाध्यक्ष सुहास गवंडकळर तसेच बाबली वांगणकर, तुषार साळगावकर,श्रेया मयेकर, वृंदा गवंडळकर, प्रशांत खानोलकर, श्री.आरोलकर,शरद मेस्त्री,शेखर काणेकर,प्रणव वांगणकर,हेमंत गावडे,साईप्रसाद नाईक,मनवेल फर्नांडिस,रवी शिरसाठ,शैलेश जामदार, हितेश धुरी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.